जिल्हा परिषदेतील साडेतीन हजाराहून अधिक शिक्षकांचे वेतन आता महिन्याच्या १ तारखेला होणार

जिल्हा परिषदेतील साडेतीन हजाराहून अधिक शिक्षकांचे वेतन आता महिन्याच्या १ तारखेला होणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी वेतनासंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आदेश दिले असून वेळेवर वेतन न झाल्यास गंभीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषदेच्या १ हजार ३३१ प्राथमिक शाळांमध्ये ३ हजार ६५२ शिक्षक-शिक्षिका कार्यरत आहेत. बहुसंख्य शिक्षकांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात जमा होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक वेळा महिन्याच्या दुस-या आठवड्यापर्यंत वेतन रखडत होते. यासंदर्भात काही शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांची भेट घेतली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading