political shivsena

एमएमआरडीए ची घरे पूर्वीप्रमाणेच ठाणे महापालिकेला उपलब्ध करून द्यावीत – प्रताप सरनाईक

एमएमआरडीए ची घरे पूर्वीप्रमाणेच ठाणे महापालिकेला उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वीच एमएमआरडीए ची घरे ठाणे महापालिकेला न देण्याचे धोरण एमएमआरडीए आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी स्वीकारले होते. त्यामुळे धोकादायक इमारती मधील तसेच रस्ता रुंदीकरणातील बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न महापालिकेपुढे उभा राहिला होता. यासंदर्भात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन एमएमआरडीए ची घरे पूर्वीप्रमाणेच महापालिकेला उपलब्ध करून
देण्याची विनंती केली आहे. पूर्वी एमएमआरडीए ची ५० टक्के घरे हि महापालिकेला मिळत असल्याने शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला होता.परंतु एमएमआरडीए ने घेतलेल्या निर्णयामुळे शहराचा विकास खुंटणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. तसेच एमएमआरडीए ने महापालिका हद्दीत ४ चटई निर्देशांकानुसार जे प्रकल्प राबवले त्यास महापालिकेने पाणी, मलनि:सारण, रस्ते यांसारख्या सुविधा दिल्या असून त्याचा भार महापालिकेवर पडत असताना एमएमआरडीए ने असा निर्णय घेणे योग्य नसल्याचे मत आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. पूर्वीप्रमाणेच एमएमआरडीए ची घरे ठाणे महापालिकेला उपलब्ध करून देण्याबात एमएमआरडीए च्या अधिका-यांना आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *