govt

वीज बिले ऑनलाईन भरण्याकडे ग्राहकांचा कल

ठाणे जिल्ह्यात डिजिटल पेमेंटकडे नागरिकांचा ओढा वाढत असून विशेषत महावितरण कंपनीची वीज बिले ऑनलाईन भरण्याकडे कल आहे असे अधीक्षक अभियंता संतोष वाहाने यांनी सांगितल.

सुमारे २७ ते २८ टक्के ग्राहक ऑनलाईन बिल अदा करीत असून ही संख्या पुढील काळात वाढणार आहे.विशेष म्हणजे उच्च दाब वीज ग्राहक जे की व्यवसायिक किंवा उद्योग आहेत त्यांचेही प्रमाण यात समधानकारक आहे. जिल्ह्यात महावितरणचे भांडूप, मुलुंड, ठाणे एक, ठाणे दोन, ठाणे तीन, वागले इस्टेट असे ६ विभाग येतात. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ या ८ महिन्यातील आकडेवारी त्यांनी सादर केली.एप्रिल ९ लाख २१ हजार ८२० पैकी २ लाख १३ हजार १३८ ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले. मे ९ लाख २१ हजार ८२० पैकी २ लाख ३७ हजार ५९० ग्राहकांनी, जून ९ लाख २१ हजार ८२० पैकी २ लाख १४ हजार ९३७ ग्राहकांनी, जुलै ९ लाख २८ हजार ८५७ पैकी २ लाख २८ हजार १० ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले. ऑगस्ट ९ लाख ३२ हजार ९३३ पैकी २ लाख २१ हजार २४९ ग्राहकांनी, सप्टेंबर ९ लाख ३५ हजार २९० पैकी २ लाख २७ हजार ६२६ ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले. ऑक्टोबर ९ लाख ४० हजार पैकी १ लाख ८० हजार ६८ ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले. नोव्हेंबर ९ लाख ४० हजार पैकी १ लाख ८० हजार ९१ ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले.एकंदरीत २७ ते २८ टक्के ग्राहक या सुविधेचा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *