ST

राज्य परिवहन महामंडळातर्फे लवकर प्रवाशांना कॅशलेस स्मार्ट कार्ड सुविधा

राज्य परिवहन महामंडळातर्फे लवकर कॅशलेस स्मार्ट कार्ड सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

येत्या एक मे पासून ही योजना लागू होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करताना अनेकदा सुट्ट्या पैशांवरून वादविवाद होतात. प्रवाशांना सुट्ट्या पैशांचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कॅशलेस स्मार्ट कार्ड योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे 500 रुपयांचं कार्ड घेऊन कुटुंब अथवा मित्रांपैकी कोणालाही या कार्डाचा वापर करून प्रवास करता येणार आहे. या कार्डामध्ये रिचार्जेस करता येणार असुन अगदी घरबसल्या ऑनलाइन देखील रक्कम कार्डावर भरता येणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच छोट्या पैशांवरून होणारे वाद-विवादही टाळले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *