क्रेडीट कार्डाचं क्लोनिंग करून फसवणा-या दुकलीला अटक

हॉटेलमधील वेटर आणि पेट्रोल पंपावर काम करणा-या कर्मचा-यांना हाताशी धरून ग्राहकांच्या क्रेडीट आणि डेबिट कार्डाची क्लोनिंग करत बँक खात्यातून पैसे उडवणा-या दोघा ठगांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शाबाज अली खान आणि केशव पात्रो अशी या दोन भामट्यांची नावं आहेत. खान यातील प्रमुख सूत्रधार असून या दुकलीनं भारत आणि दुबईतील तब्बल १५ हजार कार्डांची क्लोनिंग करत कार्ड धारकांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलीसांनी या दोघांकडून कार्ड क्लोनिंग करणा-या तीन स्कॅमर मशिन, ३ लॅपटॉप, मोबाईल फोन जप्त केले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत हजारो कार्ड क्लोन करून त्यांच्या खात्यातून पैसे लंपास केले आहेत. या टोळीतील असीफ शेख, केशव रेड्डी, महम्मद अन्सारी या तिघा फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. हे तिघेही खानला भेटा आणून देणे, एटीएम मधून पैसे काढणे अशी कामं करत असत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading