Uncategorized

बीजे हायस्कूलच्या इमारतीच्या बांधकामाची ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केली पाहणी

ठाणे शहराच्या मध्यभागी असलेल्या टेंभीनाका बीजे हायस्कूलच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केली .

या पाहणीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, शिक्षण अधिकारी मीना यादव, यांच्यासह अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.टेंभी नाका ठाणे येथील १५० वर्षाची परंपरा असलेल्या बी. जे हायस्कूलच्या इमारतीचे बांधकाम १८७२ मध्ये केलेले होते. मूळ इंग्लिश स्कुल असलेली ही शाळा १४ ऑगस्ट १८८० मध्ये सर बैरामजी जीजीभाय ट्रस्ट ने रहते घर शाळेसाठी अर्पण केली होती म्हणून या शाळेचे नाव बैरामजी जीजीभाय ठाणा हायस्कूल (बीजे हायस्कूल) करण्यात आले.
या शाळेमध्ये बाळ गंगाधर टिळका पासुन अनेक नामनंत व्यक्तींनी या शाळेत घेतल्याचा इतिहास आहे.१९८४ साली शाळा धोकादायक झाल्याने ही इमारत पाडण्यात आली. तेव्हापासून या कामाला निधीची तरतूद मिळत नसल्याने काम रखडले होते. खासदार राजन विचारे यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये याचा पाठपुरावा सुरु केला.पहिल्या टप्प्यातच १४.३५ कोटीची शासन स्तरावरून मंजुरी मिळवली. परंतु वास्तुविशारद आणि ठेकेदार यांच्या आडमुठेपणामुळे हे काम वेळेत पूर्ण झाले नाही. जिल्हा नियोजनच्या मिटिंग मध्ये वारंवार हा मुद्दा उपस्थितीत केला जात होता. पंरतु त्याची दाखल न घेतल्याने खा. विचारे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या समवेत प्रत्यक्ष जागेवर पहाणी केली. खासदार विचारे यांना या शाळेचे बांधकाम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करून देण्याचे आश्वासन बांधकाम विभागाकडून देण्यात आले आहे. तसेच या हायस्कूलच्या २५५४ चौ. मी. जागेपैकी १०५६ चौ. मी. वर बांधकाम झालेला असून त्यामध्ये तळमजला + ६ मजले उभे राहिले आहेत त्यापैकी १४९८ चौ. मी. मोकळे मैदान खेळण्यासाठी राहणार आहे. या जागेवर पार्किंग होऊ नये यासाठी इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी आणि ऑफिसेस पहिल्या मजल्यावर बांधण्यात यावीत जेणेकरून मुलांसाठी खेळाचे मैदानही तयार होऊ शकेल असे खा. राजन विचारे यांनी नमूद केले.या नवीन इमारतीमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी असे एकत्रित मुलामुलींचे वर्ग सुरु करून देणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच या शाळेत सेमी इंग्लिश वर्ग सुद्धा सुरु करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *