political shivsena

अंबरनाथ मध्ये जिल्ह्यातील पहिले जागतिक दर्जाचे शुटींग रेंजचे येत्या शुक्रवारी भूमिपूजन.

कल्याण लोकसभा मतदार संघातील अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे आणि जिल्ह्यातील पहिले जागतिक दर्जाचे शुटींग रेंजचे भूमिपूजन येत्या शुक्रवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

जागतिक दर्जाचे शुटींग रेंज ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात व्हावे यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे हे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे शुटींग रेंजचे स्वप्न अंबरनाथ शहरामध्ये साकारणार आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी १० मीटरचेच शुटींग रेंज उपलब्ध आहेत. परंतु , मुंबईत फक्त वरळी येथे १० मी., २५ मी. आणि ५० मी. या तीन लेनचे शुटींग रेज बांधण्यात आले आहे. जागतिक शुटींग स्पर्धांमध्ये खेळाडूंना भाग घेण्यासाठी २५ ,५० मी. ची रेंज आवश्यकता असते. अंबरनाथ, बदलापुर, उल्हासनगर तसेच लगतच्या ग्रामीण भागातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडूंना २५, ५० मी. रेंजच्या शुटींग
सरावासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागत होता. अनेक खेळाडूंना आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईपर्यंत जाणे शक्य नव्हते.अंबरनाथ पश्चिम येथील नगरपरिषदेच्या सुमारे सवा एकर जागेवर १० मी., २५ मी.आणि ५० मी. चे ३ लेनमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचे जागतिक दर्जाचे शुटींग रेंज बांधण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे, असे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *