sports

महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते कराटेपटू आणि जिम्नॅशियमपटूंचा सत्कार

बंगलोर येथे 24 ते 26 नोव्हेंबरमध्ये झालेल्या 35 व्या बुडोकॉन कराटे दो इंडिया या नॅशनल कराटे चॅमिपयनशीप 2017 या स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केलेल्या ठाण्यातील मॅरिटल आर्ट बुडोकॉन कराटे वेल्फेअर असोसिएशनच्या कराटेपटूंचा सत्कार नुकताच महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

या स्पर्धेत प्रतिक रोथन, प्रणिल साखरे, अक्षय परब या कराटेपटूंनी प्रत्येकी 1 सुवर्णपदक, यश राठोड याने 2 सुवर्णपदक, हर्ष तिवारी, अथर्व पाथरे यांनी 1 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक तसेच अनिकेत नाईक, प्रथम बागवे, शशांक म्हात्रे यांनी 1 रौप्यपदक तर दर्शन चौधरी, पियुष बोराटे, तेजस शेट्टी यांनी 1 कांस्यपदक पटकावून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.कलकत्ता येथे झालेल्या नॅशनल रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत ठाण्यातील फिनिक्स जिम्नॅस्टिक ऑकॉडमीच्या जिम्नॅशियमपटूंनी विशेष कामगिरीने सुवर्णपदकांची लयलूट करीत ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या सर्व जिम्नॅशियमपटूंना महापौर मिनाक्षी शिंदे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत महापौर दालनात त्यांचा विशेष सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *