दारू पिऊन घोडबंदर रस्त्यावर पडलेल्या तरूणाचा ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

दारू पिऊन घोडबंदर रस्त्यावर पडलेल्या तरूणाचा ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नालासोपारा येथे राहणारा हाजी अन्सारी हा घोडबंदर रस्त्यावरील गायमुख वळणावर रस्त्याच्या कडेला पडला होता. त्यावेळी मीरारोड येथे कामासाठी निघालेल्या रोहित सिक्वेरा आणि मोसीन काझी या दोन तरूणांनी त्याला उठवून बसवले. तेव्हा जमलेल्या जमावातील एकाने दारू पिया है क्या असे बोलताच अन्सारी संतापून जमावाच्या अंगावर गेला तेव्हा तोल जाऊन भरधाव येणा-या ट्रकच्या मागील चाकाखाली पडल्यानं त्याचा मृत्यू झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading