वारली चित्रकलेचं पंतप्रधानांनी केलं कौतुक

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेल्या घरांमध्ये काढण्यात आलेल्या वारली चित्रकलेचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं वाटप करण्यात आलेल्या लाभार्थींशी पंतप्रधानांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी घरामध्ये काढण्यात आलेल्या वारली चित्रकलेचं कौतुक केलं. वारली चित्रकला ही जिल्ह्यातील आदिवासींची कला असल्याचं यावेळी पंतप्रधानांना सांगण्यात आलं. वाटप करण्यात आलेल्या नवीन घरांमध्ये काढण्यात आलेल्या या वारली चित्रांमुळे घराला एक आधुनिक रूप मिळालं आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी वारली चित्रकलेचं कौतुक केलं. पंतप्रधानांनी यावेळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना लाभार्थ्यांना विचारलं की यापैकी कितीजणांचं शिक्षण झालं आहे. त्यावेळी अवघ्या एका महिलेनं शिक्षण झाल्याचं सांगितलं. त्यावेळी पंतप्रधानांनी तुमच्या पुढच्या पिढीला शिक्षण मिळेल याकडे लक्ष द्या असा सल्ला दिला. घरांची योजना ही गरीबीच्या विरोधातील लढा असून आयुष्यमान भारत योजनेमुळं आरोग्य विषयक सेवा सुविधा मिळतील असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading