८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्यानं गंभीर जखमी झाल्याची घटना

एका ८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्यानं तो गंभीर जखमी झाल्याची घटना काल ठाण्यात घडली. फ्लॉवर व्हॅली मधील इमारत क्रमांक ६ मध्ये हा प्रकार घडला. मित्रांबरोबर खेळून आलेला वेद येवले हा स्केटींगचे शूज घालून जात असताना त्याचा पाय दुस-या मजल्यावरील लिफ्टमध्ये अडकला. त्यावेळी त्यानं धोक्याचा इशारा वाजवला. त्यामुळं इमारतीतील रहिवासी धावत आले. त्यानंतर लिफ्ट थांबवून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन वेदची सुटका केली. वेदच्या पायाला दुखापत झाली असून त्याला ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading