स्टारफीशच्या शुभम पवार या जलतरण पटूने जागतिक स्तरावरील स्पर्धेत पटकावला सातवा क्रमांक

स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनचा जलतरण पटू शुभम् पवार यानं स्वित्झर्लंड येथे झालेल्या श्री चिन्मॉय स्वीम मॅरेथॉन या जागतिक स्तरावरील स्पर्धेत २६.७ किलोमीटरचे सागरी अंतर ८ तास ५ मिनिटात पार करून सातवा क्रमांक पटकावला आहे. शुभम पवार हा आशिया खंडातील एकमेव जलतरण पटू आहे. शुभम पवारची या स्पर्धेसाठी निवड होताच महापालिका आयुक्तांनी त्याला कौतुकाची थाप दिली होती. शुभम पवार हा महापालिकेच्या मारूतराव शिंदे तरण तलावात नियमित सराव करत आहे. लांब पल्ल्याच्या सागरी जलतरण स्पर्धेत त्यानं अनेक पारितोषिकं पटकावली आहेत. अलिकडेच झालेल्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत त्याला सन्मानित करण्यात आलं होतं. बालेवाडी येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या नील वैद्य, विराट ठाकूर यांनी सुवर्ण पदक तर आयुषी आखडे हिनं रौप्य आणि वरद कोळी यानं कांस्य पदक पटकावलं आहे. या सर्वांची अमेरिकेत होणा-या जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading