मतदार नोंदणीला २४ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

मतदार नोंदणी करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता त्यानुसार आज अंतिम मतदार यादी प्रसिध्द करायची होती. मात्र निवडणूक आयोगानं त्याला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं येत्या २४ ऑगस्ट पर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. २४ ऑगस्टला दावे-हरकती निकाली काढले जाणार असून ३१ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. १ जानेवारीला १८ वर्ष पूर्ण करणा-या मतदारांनी मतदार नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिका-यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading