संरक्षित वन्यजीव प्राणी घरात पाळल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. येऊर गावात राहणारे महेंद्र फुफाणे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून मसण्या उद मांजर पकडलं होतं. ते त्यांनी आपल्या घरात ठेवले होते. वन विभागाला ही माहिती मिळताच वन अधिका-यांनी फुफाणे यांच्या घरी छापा मारून प्लास्टीकच्या टोपलीमध्ये ठेवलेले मसण्या उद मांजर आपल्या ताब्यात घेतले. राष्ट्रीय उद्यानात विना परवानगी प्रवेश करणे, वन्यजीव पकडणं आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासातून त्याला स्वत:च्या घरात बंदिस्त ठेवणं यासाठी फुफाणे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मसण्या उद मांजर हे वन्यजीव अनुसूची २ मध्ये समाविष्ट असून वन्यजीव अधिनियमानुसार त्याला पकडून घरात बंदिस्त ठेवणे या गुन्ह्याला ३ ते ७ वर्षाची शिक्षा आहे. चंदर फुफाणे यांच्यावर या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.