उद्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत २२ हजार स्पर्धक धावणार

३०वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा उद्या होत असून या स्पर्धेत २२ हजार स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा महापौर मिनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केली आहे. महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला उद्या प्रारंभ होणार आहे. ११ गटात ही स्पर्धा होत असून महिलांची २१ किलोमीटरची स्पर्धा हे मॅरेथॉनचं मुख्य आकर्षण आहे. जिल्ह्यासाठी मर्यादित ज्येष्ठ नागरिक ६० वर्षांवरील महिला आणि पुरूषांसाठी वेगळा गट असून या गटातील पहिल्या ५ विजेत्यांना पारितोषिकं देऊन गौरवलं जाणार आहे. रन फॉर फन ही २ किलोमीटरची स्पर्धा होणार असून या स्पर्धेत ज्युपिटर रूग्णालयातील काही रूग्ण रन टू गेट बॅक टू लाईफ या गटात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते तर समारोप शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading