हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेअंतर्गत १० नाविन्यपूर्ण महिला बचत गटांचा गौरव

हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७ तालुक्यातील १० नाविन्यपूर्ण महिला बचत गटांना स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड, भिवंडी आणि ठाणे अशा ७ तालुक्यातील महिला बचत गटांना प्रमाणपत्र आणि धनादेश देऊन गौरवण्यात आलं. हिरकणी नवउद्योजक योजना महाराष्ट्राची २०१९ मध्ये जिल्हास्तरीय निवड झालेल्या महिला बचत गटामध्ये बुनियाद बचत गट राबोडी, अभिषेक स्वयंसहाय्यत महिला बचत गट कल्याण, लक्ष्मी महिला बचत गट भिवंडी, गुरूदेव महिला बचत गट भिवंडी, संजिवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गट अंबरनाथ, अहिल्याबाई स्वयं सहाय्यता महिला बचत गट उल्हासनगर, ओमसाई महिला बचत गट शहापूर, श्रीराम समर्थ महिला बचत गट मुरबाड, नंदिनी गोग्राम महिला बचत मुरबाड आणि श्रीदत्त महिला बचत गट नेरूळ यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading