crime

बनावट नोटा विक्रीसाठी आणलेल्या एका व्यक्तीस अटक

बनावट नोटा विक्रीसाठी आणलेल्या एका व्यक्तीस वागळे गुन्हे शाखेनं जेरबंद केलं असून ५०० रूपयांच्या ५६६ बनावट नोटा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. वागळे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत पवार यांना दोन व्यक्ती ५०० रूपयांच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी हायवे जवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वागळे गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याच्या पाठीवरील बॅगेत ५०० रूपयांच्या २ लाख ८३ हजारांच्या ५६६ बनावट नोटा आढळल्या. याप्रकरणी काळुराम इंदवाळे याला पोलीसांनी अटक केली आहे. आता या नोटा कुठून आणल्या, कोणाला विकायच्या आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.

Comment here