Social

राज्य सरकार न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानं श्रमिक जनता संघ उच्च न्यायालयात दाद मागणार

राज्य सरकार न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानं श्रमिक जनता संघ उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मैला सफाई करताना मरण पावलेल्या सफाई कामगारांना मोबदला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे राज्य सरकार पालन करत नसल्यानं न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचं जगदिश खैरालिया यांनी सांगितलं. मे महिन्यात राजेंद्र बांदल, रघुवीर पुवाल, अजय पुवाल या मृत सफाई कामगारांच्या नातेवाईंकासह शिष्टमंडळानं निवासी जिल्हाधिका-यांची भेट घेतली होती. सिवर डेथप्रकरणी वारसांना १० लाख रूपये नुकसान भरपाई आणि पुनर्वसनाची मागणी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यासाठी काल श्रमिक जनता संघानं धरणं आंदोलन केलं आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. पण आता शासन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानं हा धडा अधिक तीव्र करण्याचा इशारा जगदिश खैरालिया यांनी दिला.

Comment here