NCPpolitical

कळवा, मुंब्रा, दिव्यातील पूरग्रस्तांना १५ हजारांचं अर्थसहाय्य

गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांना शासनातर्फे १५ हजाराचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे दिवा, मुंब्रा, कळवा येथे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. या पूरग्रस्तांना दिल्या जाणा-या अर्थसहाय्यामध्ये हयगय केली जात होती. ही बाब लक्षात आल्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना ४० हजारांचं अर्थसहाय्य करण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ १५ हजार रूपयांचं वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यातील पूरामुळे अनेकांच्या घरात एकही वस्तू शिल्लक राहिलेली नाही. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी योग्य नियोजन करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिवा, मुंब्रा, कळवा येथील पूरग्रस्तांना तात्काळ अर्थसहाय्य देण्याची मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला तात्काळ १५ हजारांची मदत देण्याचे आदेश दिले.

Comment here