police

ठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या – तर ५ जणांना पोलीस निरिक्षक म्हणून पदोन्नती

ठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. विहीत कालावधी पूर्ण केलेल्या या पोलीस अधिका-यांच्या पोलीस आस्थापना मंडळानं बदल्या केल्या आहेत. नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांची शहर वाहतूक शाखेत, चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणपत पिंगळे यांची पोलीस निरिक्षक मानवी संसाधन विभागात, नौपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत जाधव यांची शीळ-डायघर पोलीस ठाण्यात, राबोडी पोलीस ठाण्याचे रामाराव सोमवंशी यांची ठाणे नगर पोलीस ठाण्यात, श्रीनगर पोलीस ठाण्याचे सुनिल पंधरकर यांची अतिक्रमण विभागात, कळवा पोलीस ठाण्याचे तुकाराम पवले यांची शहर वाहतूक शाखेत, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे प्रदीप गिरिधर यांची दहशतवाद प्रतिबंधक विभागात, शहर वाहतूक शाखेचे अनिल मांगले यांची नौपाडा पोलीस ठाण्यात, गोविंद गंभीरे यांची अतिक्रमण विभागात, सुधीर खैरनार यांची अतिक्रमण विभागात, रमेश धटावकर यांची नियंत्रण कक्षात, सतेज जाधव यांचीही नियंत्रण कक्षात, गोपाळ कोळी यांची अतिक्रमण विभागात, गुन्हे शाखेच्या सुखदा नारकर यांची ठाणे नगर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यातून सुरेश अहेर यांची डोंबिवली पोलीस ठाण्यात, खडकपाडा पोलीस ठाण्यातून महेश पाटील यांची शहर वाहतूक शाखेत, कळवा पोलीस ठाण्यातून सचिन गावडे यांची शहर वाहतूक शाखेत वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातून संजय गायकवाड यांची वर्तकनगर पोलीस ठाण्यात, विशेष शाखेतून सदाशिव निकम यांची वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. तर मुंबईतून सहपोलीस आयुक्त जयराम मोरे यांची पोलीस मुख्यालयात आणि सुनिल बाजारे यांची गुन्हे शाखेत सहपोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ५ सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पोलीस निरिक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक दीपक सावंत यांची पदोन्नतीवर निरिक्षक म्हणून नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक सुखदेव पाटील यांची शहर वाहतूक शाखेत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून सुरेश आजगावकर यांची कळवा पोलीस ठाण्यात, पुणे शहरातून संतोष गोरे यांची अंबरनाथ पोलीस ठाण्यात तर सोलापूर ग्रामीणमधून चंद्रशेखर यादव यांची खडकपाडा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. तर ठाणे पोलीस आयुक्तालयाबाहेरून ११ पोलीस निरिक्षकांच्या ठाणे पोलीस आयुक्तालयात बदल्या झाल्या आहेत. जितेंद्र राठोड, कन्हैय्यालाल थोरात, शंकर चिंदरकर, वनिता पाटील, शंकर इंदळकर, मनिष पाटील, अंकुश बांगर, राजेंद्र अहिरे, रविंद्र क्षीरसागर, राजेंद्र शिरतोडे आणि सुनिल शिंदे यांची ठाणे पोलीस आयुक्तालयात बदली झाली आहे.

Comment here