cultural

नंदेश उमप यांचा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कार्यसिध्दी पुरस्कार देऊन गौरव

एखादा पुरस्कार स्वीकारणं म्हणजे मोठी जबाबदारी असते. आपल्याला मिळालेला कार्यसिध्दी पुरस्कार हा आपण पूरग्रस्तांना समर्पित करत आहोत असे उद्गार गायक आणि संगीतकार नंदेश उमप यांनी काढले. अस्मि स्टुडिओ आणि ८के मल्टीमिडीयातर्फे आयोजित रंगमल्हार कार्यक्रमात नंदेश उमप यांचा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कार्यसिध्दी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी बोलताना नंदेश उमप यांनी हे उद्गार काढले. आपल्याला मिळालेला पुरस्कार हा नवीन उभारी देणारा असतो. त्याबरोबरच जबाबदारीची जाणीव करून देणारा असतो. सूरांच्या सागरात आपण वडीलांमुळे पोहायला शिकलो. या सागरात एकदा शिरलो की नवीन सूर गवसतात असं नंदेश उमप यांनी सांगितलं.

Comment here