Traffic Police

नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीचं नियोजन

नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक विभागातर्फे वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. उद्या नारळी पौर्णिमा असून कळवा पूलावर नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यामुळं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नवी मुंबईकडून कळव्याकडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नवी मुंबईतून येणारी सर्व वाहनं पटणी येथून ऐरोली, मुलुंड चेकनाका मार्गे इच्छीत स्थळी जाऊ शकतील. उद्या सकाळी ११ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत ही प्रवेश बंदी लागू राहणार आहे.

Comment here