metro

ठाणे, भिवंडी, कल्याण या मेट्रो ५ च्या कामास पावसाळ्यानंतर सुरूवात

मेट्रो ५च्या कामास येत्या पावसाळ्यानंतर सुरूवात केली जाणार आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण असा मेट्रो ५चा मार्ग असून साडेचोविस किलोमीटरच्या या मार्गासाठी साडेआठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर १७ स्थानकं प्रस्तावित करण्यात आली आहेत. ॲबकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतर्फे या मेट्रो ५च्या मार्गाचं काम केलं जाणार आहे. हा मार्ग अर्धा उन्नत आणि अर्धा भूमिगत असणार आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण या मेट्रो ५ साठी कल्याण, एपीएमसी, कल्याण रेल्वे स्टेशन, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगाव, गोवेगाव, एमआयडीसी, राजनोली गाव, टेमघर, गोपाळनगर, भिवंडी, धामणकर नाका, आंजूरफाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळकूम आणि कापुरबावडी अशी स्थानकं प्रस्तावित करण्यात आली आहेत.

Comment here