आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून कोल्हापूरातील मजरेवाडी हे गाव दत्तक घेतले जाणार

आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून कोल्हापूरातील मजरेवाडी हे गाव दत्तक घेतले जाणार आहे. एका पत्रकार परिषदेत आमदार प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. विहंग चॅरिटेबल ट्रस्ट, प्रताप सरनाईक फौंडेशन आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा तालुक्यातील मजरेवाडी गाव दत्तक घेतलं जाणार आहे. मजरेवाडी गावात एकूण सव्वातीनशे घरं असून या गावची लोकसंख्या अडीच हजार आहे. त्यापैकी १ हजार ६२५ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आलं आहे. या गावामध्ये मनुष्यहानी झाली नसली तरी दीडशेहून अधिक जनावरं दगावली आहेत. तसंच घरांचं आणि त्यांच्या सामानाचे तसंच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या गावातील सव्वातीनशे कुटुंबांना मदतीचा हात दिला जाणार असून त्यांना पूर्ण वर्षभराचे आवश्यकतेनुसार कपडे, वर्षभराचं अन्नधान्य, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य, शेतक-यांना त्यांच्या शेतीसाठी बियाणं आणि इतर साहित्य दिलं जाणार आहे. तसंच त्यांच्या घराच्या दुरूस्तीसाठी लागणारं साहित्य आणि त्याचबरोबर आणखीनही काही सामुग्री लागल्यास दिली जाणार आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गायमुख चौपाटीवर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमातील २० टक्के रक्कम पूरग्रस्तांच्या मदतनिधीला दिली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत, शालेयपयोगी साहित्य, नवीन कपडे, खराब न होणारं अन्न, चादर, सतरंज्या आणि नवीन भांडी देण्याचं आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading