शिव फूले शाहू आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक विलास खांबे यांचे निधन

शिव फूले शाहू आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी जिल्हा सरचिटणीस विलास खांबे यांचे दीर्घ आजाराने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे निधन झाले. बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कर्मवीर सुनिल खांबे यांचे ते थोरले भाऊ होते. विलास खांबे यांना आपल्या मातोश्री इंदूताई खांबे यांच्याकडून आंबेडकरी चळवळीचे धडे मिळाले होते विलास खांबे यांनी साप्ताहिक दलित नारा या वृत्तपत्राचे संपादक म्हणूनही कार्य केले आहे. ठाण्यात अनेक गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून आंदोलने करुन घरे मिळवून दिली त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची खरी सुरुवात झाली असताना त्यांना अर्धांगवायु आजाराने ग्रासले होते.तेव्हापासून त्यांच्या समाजकार्यावर मर्यादा आल्या. त्यामुळे ते नेहमी अस्वस्थ राहात विलास खांबे यांच्या मागे पत्नी, मुले ,भाऊ भावजय आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading