अनोळखी व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे एनी डेस्क सॉफ्टवेअर संगणकावर न टाकण्याचे पोलिसांचे आवाहन

एनी डेस्क या सॉफ्टवेअरद्वारे एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. त्या व्यक्तीविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदारांना जिओ सर्विस सेंटर वरून बोलत असल्याचे सांगून एक दूरध्वनी आला. त्याने मोबाईल रिचार्ज करण्यासंदर्भात प्रलोभन दाखवले आणि बोलण्यात गुंग ठेवून एनी डेस्क हे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करायला सांगितले. त्याचा एक्सेस तक्रार दाराकडून घेतला आणि नंतर एका क्रेडिट कार्ड वरुन 50 ह्जार तर दुसऱ्या क्रेडिट कार्ड वरून 10 हजार रुपयांचा व्यवहार करून फसवणूक केली. एनी डेस्क सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यामुळे हा प्रकार झाला आहे.एनी डेस्क सॉफ्टवेअरमुळे कॉम्प्युटर वरील हालचाली समोरच्या व्यक्तीला सहज पाहता येतात.त्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे एनी डेस्क सॉफ्टवेअर संगणकावर टाकू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading