डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर शाळेच्या प्रज्ञा मोरे आणि सेजल रांगळे यांचा सत्कार

ठाण्यातील विज्ञानवीर मराठी मुलींचा प्रेरणादायी स्वानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चीन मधील विज्ञान प्रदर्शनात बेडेकर विद्यामंदिर शाळेच्या प्रकल्पाला एक कांस्य पदकआणि एक रौप्य पदक प्राप्त झाले. डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर शाळेच्या प्रज्ञा मोरे आणि सेजल रांगळे या दोघींनी रक्तातील अनिमिया कसा दूर करता येईल याबाबत प्रयोग सदर केला होता. शेवाळापासून त्यांनी चॉकलेट तयार केले होते. या चॉकलेटमुळे रक्तातील अनिमिया दूर होऊ शकतो हे त्यांनी आपल्या प्रयोगातून मांडले होते. त्यांच्या या प्रयोगाला चीन मधील विज्ञान प्रदर्शनात कांस्य पदक मिळालेले आहे. त्यांच्या या यशाची प्रेरणा इतर विद्यार्थ्यांनी घ्यावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमात प्रज्ञा मोरे आणि सेजल रांगळे या विद्यार्थींनिंचा तसेच त्यांचे मार्गदर्शक डॉ. अभिजित पद्माकर जाधव आणि शिक्षिका उज्वला संजय धोत्रे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवण्यासाठी अनेक पालक आपल्या पाल्यासह या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये खगोल शास्त्रज्ञ दा. कृ.सोमण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आयोजन परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी केले होते. 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading