कळव्या मध्ये डोंगराचा काही भाग एका चालीवर कोसळून पिता- पुत्रांचा म्रुत्यु

कळव्या मध्ये डोंगराचा काही भाग एका चालीवर कोसळून पिता- पुत्रांचा म्रुत्यु झाला. कळव्यातील पण ओतकोनेस्वर येथील ज्ञानगंगा शाळे जवळ असलेल्या आदर्श चाळीवर या डोंगराचा काही
भाग पडल्यामुळे या घराची भिंत पडली आणि या भिंतीच्या दिलेल्या खाली तीन व्यक्ती अडकल्या होत्या. ही माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्वरीत दाव
घेऊन मदत कार्य सुरू केलं. आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांची सुटका केली. यामध्ये वीरेंद्र जयस्वाल आणि सनी जयस्वाल हे पिता-पुत्र मृत्युमुखी पडले. तर आलिया जयस्वाल गंभीर
जखमी झाल्याने त्यांना छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. सध्या पाऊस जोरात सुरू असून या आदर्श चाळी जवळील डोंगराचा काही भाग एक भाग धोकादायक असल्यामुळे
या ठिकाणच्या 20 कुटुंबातील 70 रहिवाशांना ज्ञानगंगा शाळेमध्ये तात्पुरता हलविण्यात आल आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading