डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच काम हे निकृष्ट दर्जाचे असून हे कामे करणारा ठेकेदार आणि पालिका अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अषि मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.
तब्बल दोन वर्ष डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह दुरुस्तीच्या कारणास्तव बंद ठेवून लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र त्वरित पुन्हा नाट्यगृहाची दुरुस्तीची वेळ आली . मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते भरत जाधव यांचा शनिवारी ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात, पुन्हा सही रे सही या नाटकाचा प्रयोग होता.या प्रयोगावेळी ठाण्याच्या नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याचा व्हिडियो व्हायरल केला. अन नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला. याची पाहणी दौरा आमदार संजय केळकर यांनी केली, तेव्हा त्यांनी निकृष्ट दर्जाची कामे करणारे ठेकेदार आणि पालिका संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. लाखो रुपयांचा खर्च करून निर्माण करण्यात आलेले डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात दुरुस्तीनंतर पुन्हा सही रे सही या नाटकाचा प्रयोग होता.या प्रयोगावेळी ठाण्याच्या नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्यामुळे प्रेक्षकांची तारांबळ उडाली. याचाच व्हिडियो मराठी नाट्य अभिनेते भरत जाधव यांनी व्हायरल केला. आणि पालिका प्रशासनाला जग आली. या व्हिडियोची माहिती मिळताच सुट्टीच्या दिवशीच पालिका सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी पाहणी केली. अन ठेकेदार आणि संबंधितांना त्वरित काम सुरु करण्याचा सज्जड दम दिला. सभागृह नेत्यांच्या नंतर भाजप आमदार संजय केळकर यांनी डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा पाहणी दौरा केला. लाखो रुपये खर्च करून आणि दोनवर्ष नाट्यगृह बंद ठेवून काम करण्यात आले. त्यानंतर पुन्हा बिघाड झाल्याने करण्यात आलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असून कामे करणारा ठेकेदार आणि पालिका अधिकारी यांच्यावर कारवाई करण्या यावी अशी मागणी संजय केळकर यांनी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading