ठाण्यातील 591 मीटरचे 362 खड्डे बुजवल्याचा पालिका प्रशासनाचा दावा

रस्त्यांवरील खड्डयांचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून खड्डे भरण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली असून युध्द पातळीवर खड्डे भरणे मोहीम सुरू आहे. गेल्या दोन दिवसात ठाण्यातील 591 मीटरचे 362 खड्डे बांधकाम विभागाकडून भरण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची संपूर्ण यंत्रणा गेले दोन दिवस रस्त्यावर उतरली असून युध्द पातळीवर खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. माजिवडा प्रभाग समिती मध्ये सर्वाधिक 170 मीटरचे 87 खड्डे भरण्यात आले. तसेच वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये 37 मीटरचे 25, वागळे प्रभाग समिती 93 मीटरचे 47, लोकमान्यनगर प्रभाग समिती 25 मीटरचे 31, नौपाडा प्रभाग समिती 38 मीटरचे 48, उथळसर प्रभाग समिती 42 मीटरचे 20, कळवा प्रभाग समिती 68 मीटरचे 34, मुंब्रा प्रभाग समिती 50 मीटरचे 36, तर दिवा प्रभाग समितीमध्ये 68 मीटरचे 34 खड्डे भरण्यात आले. एकूण नऊ प्रभाग समिती मध्ये 591 मीटरचे 362 खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने भरले आहेत.हे खड्डे पाऊस सुरु असताना देखील कोल्ड मिक्सचरचा वापर करून भरण्यात आले असून रस्त्यावरील मोठे खड्डे भरण्यासाठी जेट पॅचर तसेच शक्य तेथे सिमेंट काँक्रीटचा वापर करून खड्डे भरण्यात आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading