परिमंडळ १ मधील मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमांतर्गत २ कोटी ६४ लाखांचा मुद्देमाल १११ तक्रारदारांना परत

ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ मधील ६ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात अडीच कोटीहून अधिक किंमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला. अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या हस्ते हा मुद्देमाल १११ तक्रारदारांना परत करण्यात आला. ठाणे नगर पोलीस ठाण्यामार्फत २६ लाख ७९ हजार, नौपाडा पोलीस ठाण्यामार्फत १८ लाख ९८ हजार, कळवा पोलीस ठाण्यामार्फत १ कोटी ४५ लाख, मुंब्रा पोलीस ठाण्यामार्फत सव्वा तीन लाख, राबोडी पोलीस ठाण्यामार्फत १० लाख ७० हजार, शीळ-डायघर पोलीस ठाण्यामार्फत ५४ लाख ३९ हजार तर पोलीस उपायुक्त परिमंडळ १ यांच्या कार्यालयातून तांत्रिक तपासाद्वारे शोधण्यात आलेले पावणे पाच लाखांचे मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले. यामध्ये सोनसाखळी, घरफोडी आणि इतर गुन्ह्यातील २९ लाख ८९ हजार रूपये किंमतीचे ४२ तोळे सोन्याचे दागिने, १३ दुचाकी, ३ तीनचाकी, ९ चारचाकी अशी ५८ लाखांची वाहनं, ३० लाखांचे मोबाईल फोन्स, सव्वा तेरा लाखांचे गाड्यांचे सुटे भाग, १२ लाख ७० हजारांची पॉलीकॅब वायर, १४ लाख १९ हजारांची रोकड त्याचप्रमाणे १ कोटी ६ लाखांचे घरगुती सामान, इलेक्ट्रॉनिक आणि इतर वस्तू असा एकूण २ कोटी ६४ लाखांचा ऐवज १११ तक्रारदारांना परत करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading