छोट्या न्यूटनचे रूपांतर संशोधकात होण्यासाठी जिज्ञासा ट्रस्टचा अभूतपूर्व कार्यक्रम

छोट्या न्यूटनचे रूपांतर संशोधकात होण्यासाठी जिज्ञासा ट्रस्टनं गेल्यावर्षीपासून एक अभूतपूर्व कार्यक्रम सुरू केला आहे. दर रविवारी सकाळी दीड तास ५ ते ८ वयोगटातील छोट्यांना एकत्र करून त्यांच्याबरोबर भरपूर धमाल करणं, मुलांना वेगवेगळे खेळ आणि साहित्य खेळायला देऊन त्यांच्यामधील निरिक्षण वृत्तीला उत्तेजन आणि चौकसपणाला प्रोत्साहन देणं हे या कार्यक्रमाचं प्रमुख सूत्र आहे. बॅटरी बंद झालेली मोटर कार हातानं ढकलल्यावर धावते, चेंडू जमिनीवर आपटल्यावर उसळतो, फुगा फुगतो आणि फुटतो, पाणी गरम होते आणि थंड होते, बर्फ वितळते, साखर-मीठ विरघळते, झाडांनाफुलं-फळं येतात आणि सुकतात अशा कितीतरी गोष्टी निरिक्षणातून मुलांना अनुभवायला मिळणार आहेत. या अनुभवातूनच ही मुलं प्रश्न विचारणार असून मुलांना कळेल अशा सोप्या भाषेत त्यामागील विज्ञान मोठी माणसे समजावून सांगणार आहेत. जिज्ञासा ट्रस्टच्या या उपक्रमात वैज्ञानिक संस्कार आणि दृष्टीकोन मुलांना लहान वयातच देण्याचे गंमतीशीर प्रकार छोट्या न्यूटनच्या क्लबमध्ये होणार आहेत. या उपक्रमात मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेत संवाद साधला जाणार आहे. येत्या १४ जुलैपासून दर रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत हा उपक्रम होणार आहे. अधिक माहितीसाठी २५४० ३८५७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading