माळशेज घाटात एक छोटी दरड कोसळल्यामुळं घाटातील वाहतूक विस्कळीत

माळशेज घाटात एक छोटी दरड कोसळल्यामुळं घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. गेले काही दिवस होत असलेल्या जोरदार पावसामुळं ही दरड कोसळल्याचं सांगितलं जातं. ही दरड कोसळल्यामुळं घाटातून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. दरड कोसळल्यानंतरही सुदैवानं कोणतीही जिवितहानी झाली नाही. आज सकाळी ही दरड हटवण्याचं काम हाती घेण्यात आल्यावर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading