शहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी 20टक्केअनुदान देण्याची खासदार राजन विचारे यांची केंद्रशासनाकडे मागणी

ठाणे शहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी २० टक्के अनुदान देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांची केंद्र शासनाकडे केली आहे. शहरांतर्गत मेट्रो च्या २९ किमीच्या अंतर्गत मेट्रो मार्गाला राज्य मंत्रिमंडळाची ९ हजार ६७४ कोटीची मंजुरी मिळाल्याने ठाणेकरांना प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या मार्गाचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी खासदार राजन विचारे यांनी शहरी विकास केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी आणि या विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांची प्रत्यक्षभेट घेऊन त्यांना शहरांतर्गत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी 20टक्के अनुदान केंद्र शासनाचे मिळावे मागणी केली.याबाबत प्रस्ताव बनवून  महापालिकेने याचा सविस्तर डीपीआर फेब्रुवारी महिन्यात दिला होता. त्याला मान्यता द्यावी अशी मागणी एका पत्राद्वारे करण्यात आली. त्यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, उपनगर अभियंता पापळकर उपस्थित होते.ठाणे शहरांतर्गत मेट्रो रेल्वेची २२ स्थानके राहणार

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading