सरस्वती सेकंडरी स्कूलमधील प्राथमिकच्या १३ तर माध्यमिकच्या ९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सरस्वती सेकंडरी स्कूलमधील प्राथमिकच्या १३ तर माध्यमिकच्या ९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सरस्वती सेकंडरी स्कूलमधील समृध्दी मानेला ८वा क्रमांक मिळाला आहे. आर्या कुप्टे, स्वरांगी धारप, लिना शेरकर, प्रथम भामरे, सृष्टी देशपांडे, गौरव पाटील, युक्ता आठल्ये आणि शर्वरी भावे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनन्या कुलकर्णीला जिल्ह्यात ९ वा क्रमांक मिळाला आहे. अनिरूध्द बर्वे, श्रेया जैतपाल, मुक्ता केतकर, सच्चिदानंद चौधरी, मधुरा देवळे, प्रथम शिंदे, शुभ्रा रसाळ, शाल्मली पाटील, संस्कृती मुसळे, युगांक अत्तरदे, स्मरणी कुलकर्णी आणि ईशा कदम या पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading