उल्हासनगर मधील झुलेलाल ट्रस्टच्या शाळेच्या स्लॅबचा काही भाग कोसळून तीन मुली जखमी

उल्हासनगर मधील कॅम्प नंबर २ मध्ये असलेल्या झुलेलाल ट्रस्टच्या शाळेच्या वर्गाच्या स्लॅबचा काही भाग कोसळून तीन मुली जखमी झाल्या. कॅम्प नंबर २ परिसरात ही झुलेलाल शाळा असून सुरूवातीला इमारतीचा स्लॅब कोसळल्याची अफवा निर्माण झाली होती. मात्र वर्गात शिक्षक शिकवत असताना स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला. यामध्ये तीन मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. झुलेलाल शाळा प्रशासनानं इमारतीच्या एका ठिकाणचे प्लास्टर पावसामुळे पडले असून इमारत पूर्णत: सुरक्षित असल्याचं सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading