ठाणे रेल्वे स्थानकातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकातील एक मोठा फलक पडला

चर्चगेट स्थानकाजवळील जाहिरात फलक पडून एकाचा मृत्यू होण्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही एक भव्य फलक आज पडला. मात्र सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. सध्या वायु वादळानं थैमान घातलं आहे. आता वायु वादळाचा ओघ कमी झाला असला तरी किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत आहेत. या जोरदार वा-यांमुळे ठाणे रेल्वे स्थानकातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकातील एक मोठा फलक आज सकाळी पडला. जोरदार वारा सुटल्यामुळं हा फलक जमिनीकडे झुकला होता. त्यानंतर काही वेळानं तो जमिनीवर पडला. सुदैवानं यावेळी प्रवाशांची फारशी वर्दळ नव्हती त्यामुळं हा फलक पडल्यानंही सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading