डॉ. अनिल काकोडकर यांनी सातारा पालिकेचा पुरस्कार नाकारावा – हिंदू जनजागृती समितीचं आवाहन

सातारा पालिकेच्या वतीनं देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार काकोडकर यांनी नाकारावा असं आवाहन हिंदू जनजागृती समितीनं केलं आहे. एका पत्रकार परिषदेत समितीनं हे आवाहन केलं. काकोडकर यांचं कार्य आणि देशाप्रतीचे योगदान हे निश्चितच आहे. मात्र एका ज्येष्ठ आणि देशभक्त शास्त्रज्ञाला समाजाची दिशाभूल करणा-या डॉ. दाभोळकरांच्या नावाने पुरस्कार मिळणं हा विरोधाभास आहे. काकोडकर यांनी हा पुरस्कार न स्वीकारल्यास काकोडकर यांची प्रसिध्दी, पत आणि देशाविषयीच्या योगदानात तसूभरही फरक पडणार नाही. याउलट आर्थिक घोटाळे करणा-या आणि हिंदूंच्या धर्मश्रध्दांवर जाणीवपूर्वक टीका करणा-या अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या डॉ. दाभोळकरांच्या नावानं दिलेला पुरस्कार स्वीकारल्यास एक शास्त्रज्ञ दाभोळकरांच्या गैरकारभाराचे आणि खोट्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचे समर्थन करत आहे असा चुकीचा संदेश जाईल त्यामुळं डॉ. काकोडकरांनी हा पुरस्कार नाकारावा आणि समस्त हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर राखावा असं आवाहन हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading