ठाण्यातील साडेतीन हजारांहून अधिक वृक्ष वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं ठाणे मतदाता जागरण अभियानाच आवाहन

ठाण्यातील सुमारे साडेतीन हजारांहून अधिक वृक्ष वाचवण्यासाठी ठाणेकरांनी एकत्र यावे असे आवाहन ठाणे मतदाता जनजागरण अभियानाने केला आहे. ठाणे महानगरात आचारसंहिता सुरू असतानाच वृक्ष समितीची बैठक पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बोलावली आणि त्यात मेट्रो 4 प्रकल्प,रस्ते रुंदीकरण आणि सात खाजगी विकासक यांच्या गृहनिर्माण तसेच एक पार्किंग प्रकल्पातील एकूण ३५२७ वृक्ष तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे.ठाण्यातील प्रचंड वृक्षतोडीमुळे शहराच्या पर्यावरणावर विनाशक परिणाम होत आहेत. महानगरात सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याच्या आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या अनाकलनीय आणि पर्यावरणविरोधी निर्णयामुळे तसेच अवाढव्य प्रकलपांच्या उभारणीमुळे प्रचंड उष्मा वाढलेला आहे. नागरिकांना प्रवास करतांना याचा त्रास होत आहे. खाडीकिनारी असलेली तिवरांची संरक्षक जंगलही उध्वस्त करून तेथेही काँक्रीट टाकून तेथेही नवे संकट निर्माण केले जात आहे.महानगरातील सर्व हिरवाई नष्ट करण्याच्या वृत्तीने ठाणेकर नागरिकाना रोज नवनव्या संकटात महापालिका टाकत आहे. या वृक्षतोडीचा निषेधआणि वृक्षा बरोबर मानवाचे घट्ट नाते आहे हे दाखविण्यासाठी वृक्षबंधन(राखी बंधन) करावे, निवेदनावर सही करावी आणि आपला निषेध व्यक्त करावा, अस आवाहन ठाणे मतदाता जागरण अभियान आणि म्युस तर्फे करण्यात आल आहे. कोलशेत येथे एअर फोर्स स्टेशन जवळ ३०० वर्षे जुने वडाचे प्रचंड झाड हटविण्याची कारवाई कोणतीही परवानगी न घेता लोढा बिल्डर्सने सुरू केली, त्याच्या पारंब्या कापून तेथे काँक्रीटची भिंत घालण्याचे काम सुरू केले आहे, याबाबत रवीवारी सकाळी ७.३० ते १० हेरिटेज ट्री वॉक ‘फर्न’ संस्थेतर्फे आयोजित केला आहे. या दोन्ही कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक व युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे मतदाता जागरण अभियानन केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading