आमदार संजय केळकर यांच्या कडुन मावळी मंडळ शाळेला आमदार निधीतून तातडीन ३५ संगणक

चरई परिसरातील मावळी मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला अचानक लागलेल्या आगीत शाळेतील संगणक जाळून खाक झाले. आमदार संजय केळकर यांनी मावळी मंडळाच्या शाळेला भेट देऊन तातडीने आमदार निधीतून तब्बल ३५ संगणक तातडीने उपलब्ध करून दिले आहेत.मावळी मंडळाच्या शाळेत शॉर्टसर्किटने अचानक लागलेल्या आगीत शाळातील संगणक रूमचा जळून खाक झाला. या आगीत शाळेतील संगणक रूममधील जवळपास ३५ संगणक जाळून खाक झाले. एकही संगणक शिल्लक राहिला नाही. याची दाखल घेत भाजप आमदार संजय केळकर यांनी मावळी मंडळाच्या शाळेला भेट दिली. त्यांनी शाळेच्या संगणक रूमची पाहणी केली. त्यानंतर त्वरित आमदार निधीतून ३५ संगणक उपलब्ध करून दिले. याबाबत संजय केळकर म्हणाले, आगीत दुर्दैवाने सगळेच संगणक जळाले आहेत. या संगणक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्वाचे आहेत. आता १३ जूनला पुन्हा शाळा सुरु होईल. तेव्हा विद्यार्थ्यांना मात्र संगणक आवश्यक आहे. तत्पूर्वी प्रशासकीय काम आता सुरु होईल त्यामुळे आमदार निधीतून त्वरित मावळी मंडळ शाळेला ३५ संगणक मिळतील. एखाद्या संस्थेला विद्यार्थ्यांना संगणक उपलब्ध करून देण्यासाठी खूप कसरत करावी लागते. त्यामुळे शाळा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना संगणक आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading