दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना घरे उपलब्ध करून देण्याची सभागृह नेते नरेश म्हस्केची मागणी

ठाण्यातील दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना घरे उपलब्ध करून देण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकेतर्फे विविध योजना राबवण्यात येत आहेत. दिव्यांग व्यक्तींचा उदरनिर्वाहाची सोय महापालिकेने त्यांना उपलब्ध करून दिलेल्या स्टॅल मुळे झाली आहे. मात्र उदरनिर्वाहा बरोबरच त्यांच्या निवासाची सोय सुद्धा तितकीच आवश्यक आहे. त्याकरता महापालिका क्षेत्रातील देवळांना घरे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे.महापालिका आयुक्तांनी दिव्यांग व्यक्तीच्या निवार्‍याची सोय करण्याकरता 190 घरांचे वाटप करण्यास सहमती दर्शवली आहे. दिव्यांगांना घरे देण्याबाबत धर्मवीर दिव्यांग सेना सतत मागणी करत असून पालकमंत्री ही याबाबत विचारणा करत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी तातडीने यामध्ये लक्ष घालून दिव्यांग व्यक्तींना घरे उपलब्ध करण्याकरता कार्यवाही करावी अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading