चला ! लहानपणात पुन्हा रमूया…… विसरलेले खेळ पुन्हा खेळूया या आगळा वेगळा कार्यक्रमाच आयोजन

ठाण्यातील एक प्रा. डॉ. सुनील कर्वे ह्यांनी सामाजिक जाणिवेतून मातृदिनाचे औचित्य साधूत महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला आगळा वेगळा चला ! लहानपणात पुन्हा रमूया…… विसरलेले खेळ पुन्हा खेळूया या कार्यक्रमाच आयोजन केल होत. दररोजच्या रगाड्यात अडकलेल्या महिला एकदिवस आपल्या लहानपणीच्या खेळांच्या दुनियेत रमता यावे आणि विस्मृतीत गेलेल्या खेळांची उजळणी व्हावी ह्या हेतूने डॉ सुनील कर्वेयांनी हा कार्यक्रमाची संकल्पना आखली होती. गेल्या तीन वर्षांपासून मुला-मुलींसाठी असा उपक्रम प्रा. डॉ. सुनील कर्वे राबवत आहेत. पण यंदा प्रथमच महिलांसाठी ठाण्यात अश्या प्रकारचं हा पहिलाच उपक्रम राबवला. बालपणीचा काळ किती सुखाचा असतो ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवणते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हल केच गोंजारण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन कर्वे यांनी केले होते. ह्या कार्यक्रमात आपडीथापडी , शिवाजी म्हणतो , वाघोबा किती वाजले, दगड का माती, फुगडी, ठिक्कर, काचपाणी, विषामृत, आंधळी कोशिंबीर, खाम खाम खांबोली , कानगोष्टी, आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं, कांदाफोडी, टिपी टिपी टॉप टॉप, चिमणी भुर्रर्र – कावळा भुर्रर्र, तळ्यातमळ्यात, उभाखो-खो, संत्रालिंबू, रुमालपाणी अशा प्रकारच्या अनेक जुन्या खेळांना उजाळा दिला उपस्थितांना हे खेळ समजावून देऊन त्याचे प्रात्यक्षिकही दाखवली मग महिलानांनी हे खेळ मनोसोक्त खेळले. मात्र आजच्या बालगोपाळांच्या पिढीच्या नशिबी हे खेळ कसे येणार म्हणून हा खटाटोप. प्रत्यक्ष पालकांनी मुलांबरोबर लहान होऊन हे खेळ खेळणे जरुरी आहे असे कर्वे ह्यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading