ठाणे ग्रामीण पोलीस चालक कक्षावर झाड पडल्यामुळे तीन पोलीस कर्मचारी जखमी

उर्जित हॉटेलच्या मागे असलेल्या ठाणे ग्रामीण पोलीस चालक कक्षावर झाड पडल्यामुळे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास नारळाचे झाड या कक्षावर पडलं. हे झाड पडताना इतर झाडाच्या फांद्याही त्याच्याबरोबर या कक्षावर पडल्यानं व्ही. के. माने, एन. आर. आव्हाड आणि डी. एम. गवारे असे तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading