मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे राज्यातील साहित्यिकांना श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारानं तर जिल्ह्यातील साहित्यिकांना वा. अ. रेगे साहित्य पुरस्कारानं गौरवलं जाणार

मराठी ग्रंथसंग्रहालयाचा १२६वा वर्धापन दिन १ जून रोजी साजरा होत असून यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे राज्यातील साहित्यिकांना श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारानं तर जिल्ह्यातील साहित्यिकांना वा. अ. रेगे साहित्य पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. एका पत्रकार परिषदेत मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर आणि व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड यांनी ही माहिती दिली. या वर्धापन दिनानिमित्त ३१ मे ते २ जून पर्यंत ३ दिवस पुस्तक आदान प्रदान महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं निलेश गायकवाड यांनी सांगितलं. या सोहळ्यास राज्य मराठी साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आणि वा. अ. रेगे साहित्य पुरस्कार सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. वा. अ. रेगे पुरस्कार ललित विभागात चांगभलंचे लेखक साहेबराव ठाणगे यांना तर ललितेतर विभागात कापूसचे लेखक राजीव जोशी यांना प्रदान केला जाणार असल्याचं विद्याधर वालावलकर यांनी सांगितलं. मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे महिन्यातून एकदा ग्रंथ प्रदर्शन भरवण्याची योजना असून यावेळी महिन्यातून एकदा ग्रंथ आदान प्रदान करण्याचा मानस विद्याधर वालावलकर यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिकांना ग्रंथ आदान प्रदान महोत्सवात पुस्तकं द्यायची असतील तर अशी पुस्तकं घरी येऊन स्वीकारली जातील असंही विद्याधर वालावलकर यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading