ऑनलाईन तिकिट बुकींगमध्ये गोंधळ झाल्यानं नाट्यगृहात खळबळ

ऑनलाईन तिकिट बुकींगमध्ये गोंधळ झाल्यानं नाट्य रसिकांना नाटकासाठी तिष्ठत राहण्याबरोबरच बुकींग केलेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घातल्यामुळे नाट्यगृहात खळबळ उडाली. काल गडकरी रंगायतनमध्ये एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग होता. पण नाट्य निर्मात्यानं क्षमतेपेक्षा जास्त तिकिटांची विक्री केल्यानं गोंधळ झाला. या नाटकाच्या निर्मात्यांनी ऑनलाईन तिकिट विक्री प्रमाणापेक्षा जास्त केली आणि नाट्यगृहातही तिकिट विक्री झाल्यानं आधीच हाऊसफुल असलेल्या नाटकाला प्रेक्षकांना तिष्ठत रहावं लागलं. परिणामी ऐनवेळी कमी तिकिट दरात साध्या खुर्च्या टाकून प्रेक्षकांची सोय करावी लागली तर काही प्रेक्षकांना तिकिटांची रक्कम परत करण्याची नामुष्कीही निर्मात्यांवर ओढवली. या नाटकाची ५० तिकिटं अधिक विकली गेली. थिएटरमधील मोकळ्या पॅसेजमध्ये साध्या खुर्च्या टाकून काही प्रेक्षकांची व्यवस्था करण्यात आली तर काही प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत देण्यात आले. या गोंधळामुळे नाटकही अर्धा तास उशिरानं सुरू झाल्यानं प्रेक्षकांनी गोंधळ घातला. याप्रकरणी नाटकाचे सर्वेसर्वा प्रशांत दामले यांनीही झालेल्या गैरसोयीबद्दल प्रेक्षकांची माफी मागितली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading