घोडबंदर रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम

घोडबंदर रस्त्यावर चेना ब्रीजजवळ दुपारच्या सुमारास एक लहान ट्रक उलटा झाल्यानं या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारी ३ च्या सुमारास घोडबंदरकडून ठाण्याकडे अतिशय वेगानं येणारा आयशरचा ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यावर उलटा झाला. हा ट्रक रस्त्याच्या मध्यभागीच उलटा झाल्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झाला. रस्त्यावरून येणारे जाणारे वाहन चालक या अपघाताच्या ठिकाणी अपघात पाहण्यासाठी आपली वाहनं हळू करत असल्यामुळं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading