ठाण्यामध्ये उद्यापासून आंबा महोत्सव

ठाण्यामध्ये उद्यापासून आंबा महोत्सव सुरू होत असून या आंबा महोत्सवाचं उद्घाटन सुप्रसिध्द सिने-अभिनेता संतोष जुवेकर याच्या हस्ते होणार आहे. आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली. संस्कार संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठानाच्या संयुक्त विद्यमानं तसंच कृषी पणन मंडळाच्या सहकार्यानं न्यू इंग्लिश स्कूल येथे १ ते १० मे दरम्यान या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या आंबा महोत्सवात यंदा ५० स्टॉल्स असून त्यातील ४० स्टॉल्स हे आंब्याचे आणि उर्वरित स्टॉल्स हे महिला बचत गटाचे असून त्यामध्ये आंबा पोळी, पन्हं अशा विविध प्रकारांच्या कोकणातील उत्पादनांची विक्री होणार आहे. यंदा आंब्याचं उत्पादन घटलं असून तरी आंबा महोत्सवात आंब्याचे दर सर्वसामान्यांना परवडतील असेच असतील असं सांगण्यात आलं. शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळ घालून कोकणातील शेतक-यांना या महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्यात आलं आहे. या महोत्सवातील आंबा हा गवतात पिकवलेला असल्याचं सांगण्यात आलं. या आंबा महोत्सवाचं यंदाचं हे १४वं वर्ष आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading