सखी मतदान केंद्रात लग्न समारंभासारखे आल्हाददायक वातावरण

ठाणे लोकसभा मतदारसंघात फक्त महिलांनी नियंत्रित केलेलं सखी केंद्रं आणि अपंगांनी नियंत्रित केलेल्या सक्षम केंद्रांवर आज निवडणुकीपेक्षा एखाद्या लग्न समारंभासारखं वातावरण होतं. ठाणे लोकसभा मतदारसंघात १५ सखी तर ५ सक्षम केंद्र निर्माण करण्यात आली होती. सखी केंद्रांमध्ये निवडणूक प्रक्रिया संपूर्णत: महिला कर्मचा-यांनी हाताळली. अगदी शिपायापासून मतदान केंद्र अधिका-यापर्यंत सर्व काम हे महिलांवर सोपवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे ५ सक्षम केंद्रात निवडणूक प्रक्रिया ही संपूर्णत: दिव्यांग कर्मचा-यांनी हाताळली. नौपाड्यातील बेडेकर विद्यामंदिरमध्ये असलेल्या सखी केंद्रात सकाळपासूनच एखाद्या लग्न समारंभाप्रमाणे वातावरण होतं. मतदारांचं बँडच्या जल्लोषात स्वागत केलं जात होतं. येणा-या मतदारांवर फुलं उधळण्यासाठी महिला उभ्या होत्या. अत्तराचे फवारे सोडण्यात आले होते. मतदान केंद्राबाहेर मदतीसाठीही महिला होत्या. तर मतदान केंद्रातही सर्व काम महिलांकडून केलं जात होतं. या सर्व महिला गुलाबी रंगाचे फेटे घालून मतदान प्रक्रिया हाताळत होत्या. त्यामुळं नेहमीच्या रूक्ष वातावरणाऐवजी आल्हाददायक आणि सुखावणारं वातावरण मतदान केंद्राबाहेर पहायला मिळत होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading