मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सुसज्ज नियंत्रण कक्ष

जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सुसज्ज नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. मतदार आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबींचे नियंत्रण या कक्षातून होत आहे. या नियंत्रण कक्षात सुसज्ज अशी आधुनिक यंत्रणा उभारण्यात आली असून जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर हे या यंत्रणेवर स्वत: जातीनं लक्ष ठेवून होते. निवडणूक कर्मचा-यांची पथकं मतदान साहित्यापासून मतदान केंद्रांकडे रवाना होण्याबरोबरच ही मतदान यंत्रं उद्या स्ट्राँग रूममध्ये जाईपर्यंत सर्व नियंत्रण या कक्षातून केलं जात आहे. मतदान प्रक्रिया, मतदान सुविधा सेवा, सी-व्हीजील ॲप, १९५० हेल्पलाईन नंबर, जिल्ह्यातील ७०० मतदान केंद्रांचे वेब कास्टींग, निवडणूक कामासाठी वापरात असलेल्या वाहनांचे जीपीएस ट्रॅकींग तसंच वेळोवेळी केल्या जाणा-या ऑनलाईन रिपोर्टींगसह इतर विविध सुविधा या नियंत्रण कक्षात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रनिहाय नेमण्यात आलेले विभागीय अधिकारी, दर दोन तासाला अपलोड करणारे अहवाल, त्यानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी ते जिल्हा निवडणूक अधिकारी या प्रक्रियेत समाविष्ट आहेत. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीनं राज्य निवडणूक आयोगाशी जोडलेली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading