गोवा येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या जलतरण पटूंची चमकदार कामगिरी

गोवा येथे झालेल्या १४व्या ऑल इंडिया सुहासिनी आर लोटलीकर जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या जलतरण पटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या जलतरण स्पर्धेसाठी देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. १२ वर्षाखालील गटात सवर आकुसकर हिनं १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदक, वेदांत गोखलेनं २ सुवर्ण, १ कांस्य, १० वर्षाखालील गटात रोहन अंबुरेनं १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य, ८ वर्षाखालील गटात आदित्य घागनं ३ सुवर्ण, १ रौप्य आणि वैयक्तीक चॅम्पियनशीप तर ६ वर्षाखालील गटात मीर विरा यानं १ रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत आयुषी आखाडे, आर्या गाडे, मिहिका सुर्वे, इदांत चतुर्वेदी, विहान चतुर्वेदी हेही सहभागी झाले होते. या सर्व स्पर्धकांना प्रशिक्षक अतुल पुरंदरे, कैलास आखाडे यांचं मार्गदर्शन लाभलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading